अग्निशमन दलाच्या मदतीसाठी बनवला तब्बल 338 फूट लांब पिझ्झा

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले. हजारो लोकांना आपले घर सोडावे लागले होते. याच आगपिडितांना वाचवण्यासाठी लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. अशाच एका ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे राहणाऱ्या भाऊ-बहिणीने अग्निशामक दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी फंड जमा करण्यासाठी हटके कामगिरी केली आहे.

या भावा-बहिणीने फंड जमा करण्यासाठी 338 फूट लांब आणि 90 किलोग्रॅम वजनाचा पिझ्झा बनवला आहे. पिएरे आणि त्यांची बहिण रोजमेरी मॉइओने 4 तासात हा पिझ्झा तयार केला. यासाठी त्यांनी दोन कन्वेअर ओव्हनचा वापर केला. या खास पिझ्झाला मार्गरिटा नाव देण्यात आले नाही.

https://www.instagram.com/p/B7gGKlYJ-fK/?utm_source=ig_web_copy_link

पिझ्झाचे 4 हजार स्लाइस करण्यात आले व लोकांना वाटले. यावेळी 3 हजार लोक जमा झाले होते व न्यू साउथ वेल्स रूरल फायर सर्व्हिससाठी फंड जमा केला.

हॉटेलचे मालक पिएरे माइको म्हणाले की, हा कार्यक्रम कोणताही विश्वविक्रम बनविण्यासाठी होता. याचा उद्देश अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी पैसे करणे हा होता. याद्वारे किती फंड जमा झाला, हे समजू शकले नाही.

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे 30 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर 3000 पेक्षा अधिक घरे आगीत नष्ट झाली. 50 कोटी पेक्षा अधिक प्राण्यांना या आगीचा फटका बसला.

Leave a Comment