ट्विटरवर का ट्रेंड होत आहे #प्रियावर्मा ?

कालपासून ट्विटर #प्रियावर्मा ट्रेंड करत आहे. यामागे कारण व्हायरल होणारा एक व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक महिला आंदोलन करणाऱ्या एका व्यक्तीला पकडते व त्याच्या कानाखाली वाजवून देते. ही महिला मध्य प्रदेशमधील राजगढच्या उपजिल्हाधिकारी आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की पोलीस आणि प्रदर्शन करणाऱ्यांमध्ये धक्काबुक्की होते. तेथे प्रिया वर्मा देखील उपस्थित आहेत. कोणीतरी त्यांचे केस ओढते व त्यांना धक्का बुक्की करते. त्यानंतर त्या एका व्यक्तीच्या कानशिलात लगवतात.

राजगढमध्ये कलम 144 लागू आहे. त्यानंतर देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. तेथेच ही घटना घडली.

आणखी एका महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ समोर येत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेअर केला आहे.  ही महिला राजगढच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता आहेत.

त्या देखील आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात करण्याचे काम करत आहेत. त्यांनी देखील असभ्य वर्तन करणाऱ्या आंदोलन कर्त्याच्या कानशिलात लगावली.

ट्विटर या बाबतीत दोन गट पडले आहेत. काहीजण या कारवाईबद्दल राज्य सरकारला प्रश्न विचारत आहेत. तर काहीजण प्रिया वर्मा यांचे कौतूक करत आहेत. यानंतर ट्विटरवर #प्रियावर्माजिंदाबाद ट्रेंड होऊ लागले.

प्रिया वर्मा या इंदौरच्या जवळील मांगलिया गावातील आहेत. वयाच्या 21व्या वर्षी त्या डीएसपी झाल्या होत्या. या घटनेनंतर प्रिया वर्मा यांना धक्का बुक्की आणि केस ओढल्याच्या आरोपाखाली 2 लोकांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Leave a Comment