
न्यूयॉर्क : पॉर्न साइटवर भारतात जरी बंदी असली तरी त्या इतर देशांमध्ये सुरू आहेत. न्यूयॉर्कमधील एका कर्णबधीर व्यक्तीने आता तीन पॉर्न साइटविरोधात तक्रार दाखल केली आहे. भेदभावाचा आरोप करताना त्याने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, मला सबटायटलशिवाय असलेल्या व्हिडिओमुळे त्याची पूर्ण मजा घेता आली नसल्याचे म्हटले आहे.
तसला चित्रपट बघताना मजा नाही आली म्हणून ठोकला 3 वेबसाइटविरुद्ध दावा!
गुरुवारी ब्रुकलीन फेडरल कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत पॉर्नहब, रेडट्यूब आणि यूपॉर्न या साइटविरुद्ध यारोस्लाव सुरिझ नावाच्या व्यक्तीने तक्रार केली आहे. अमेरिकन्स विथ डिसअॅबिलिटी अॅक्ट कायद्याचे या साइटने उल्लंघन केल्याचा दावा यारोस्लावने केला आहे. यारोस्लावने याआधीही अशाच प्रकारचा दावा फॉक्स न्यूजविरोधात केला होता.
23 पानी अर्जात यारोस्लोवने म्हटले की, काही व्हिडिओ त्याला ऑक्टोंबर आणि या महिन्यात बघायचे होते पण बघता आले नाहीत. कर्णबधीर आणि ज्यांना कमी ऐकू येते त्यांना सबटायटलशिवाय व्हिडिओचा पूर्ण आनंद घेता येत नाही. या व्हिडिओचा सामान्य लोकांना पूर्ण आनंद मिळतो, असेही यारोस्लोवने म्हटले आहे. यारोस्लोव्हने पॉर्न साइटवर असलेल्या व्हिडिओला सबटायटल देण्याची मागणी केली आहे. पॉर्नहब साइटने या मागणीबाबत सांगितले की, सबटायटलचा साइटवर एक सेक्शन आहे. त्याची लिंकही कंपनीकडून देण्यात आली आहे.
