
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलाच पाहिजे. याला जे विरोध करत असतील त्यांना अंदमानात पाठवा असे मत व्यक्त केले आहे.
सावरकरांच्या भारतरत्नला विरोध करणाऱ्यांना दोन दिवस तरी अंदमानात पाठवा
सावरकरांनी जी शिक्षा अंदमानात भोगली तिथे त्यांच्या भारतरत्नला विरोध करणाऱ्यांना दोन दिवस तरी पाठवायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या आताच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. महाविकास आघाडीचा सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही पक्षविरोधी आहे. आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
