
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम असतानाच आता भारताने पाकिस्तानला आणखी एक जोरदार दणका दिला आहे. पाकिस्तानमध्ये नियोजित असलेली आशिया कप २०२० ही स्पर्धा भारताच्या नकारामुळे पाकिस्तानात खेळवली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद होते, पण भारताच्या नकारानंतर या स्पर्धेचे आता ठिकाण बदलण्यात येणार आहे.
भारताच्या नकारामुळे पाकिस्तानने गमावले आशिया कप स्पर्धेचे यजमानपद
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आशिया कप २०२० ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषक २०२० या स्पर्धेच्या महिनाभर आधी खेळला जाणार आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद होते. पण या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आले आहे. आता या स्पर्धेसाठी बांगलादेश, श्रीलंका किंवा दुबई या पर्यायांचा विचार केला जात आहे. आशिया कप स्पर्धा टी २० प्रकारात खेळली जाणार आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून आशिया कप स्पर्धा टी २० पद्धतीने खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टी २० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.
