जाणून घ्या जगप्रसिद्ध कारच्या लोगोबद्दलची रंजक कथा

Image Credited – News18

कोणत्याही कंपनीचा लोगो हा त्या कंपनीचे विचार आणि दृष्टीकोन दर्शवत असतो. आज कंपनीचा लोगो बनविण्यावर ब्रँड, जनसंपर्क, मार्केटिंग आणि जाहिराती इत्यादी गोष्टी अवलंबून असतात. मात्र एक काळ असा होतो जेव्हा कंपन्यांना लोगोची प्रेरणा कुटुंबातील प्रमुख, शहराचे झेंडे यावरून येत असे. जगातील अशाच काही प्रतिष्ठित कार लोगोबद्दल जाणून घेऊया.

 

Image credited – Pinterest

ऑडी –

अनेक ऑटोमोबाईल निर्मात्यांप्रमाणे ऑडीने देखील 20व्या शतकात एकाच व्यवसायात अनेक कंपन्यांचे विलिनिकरण केले. सुरूवातीच्या लोगोमध्ये चार मूळ कंपन्यांची नावे (ऑडी, डीकेडब्ल्यू, होर्च आणि वाँडर) गोल रिंगच्या मध्ये दाखवली जात असे. ही नावे गायब झाली मात्र इंटरलॉकिंग रिंग तशाच आहेत.

Image Credited – 1000 Logos

टोयोटो –

1989 मध्ये कंपनीने 50व्या वर्षानिमित्त लोगो पुन्हा डिझाईन केला. यामध्ये तीन अंडाकार होते व ते एकमेंकाना भेदत होते. आतील दोन अंडाकार मिळून इंग्रजीतील T अक्षर तयार होते. कंपनीनुसार, या T मध्ये अंडाकार स्टेअरिंग व्हिलसोबतच ग्राहकांची अपेक्षा आणि कार निर्मितीच्या आदर्शाचे प्रतिक आहे. सर्वात बाहेरील अंडाकार टोयोटोची गळा भेट घेऊन जगाचे प्रतिनिधित्व करत आहे.

Image Credited – designroast

बीएमडब्ल्यू –

बीएमडब्ल्यूचे प्रवक्ता टॉम प्लुंस्कीने 2010 मध्ये सांगितले होते की, कंपनीच्या लोगोमधील निळा आणि पांढरा बवेरियन ध्वज हा केवळ एक संकेत आहे.

Image Credited – Pngimg

कॅडिलेक –

अमेरिकेन लग्झरी कारचे नाव डेट्राइटचे संस्थापक एंटोनी डी ला मौते कॅडिलेक यांच्यावरून घेण्यात आलेले आहे. लोगोच्या प्रतिकामध्ये तीन रंगाचे बँड (साहस, गुण आणि वीरतेचे प्रतिनिधित्व करतात), एक मुकुट, माळ आणि छोटे बदक होते. कॅडिलेकच्या जुन्या लोगोमध्ये बदकांचा समावेश होता, जे आता काढून टाकण्यात आले आहेत.

Image Credited – Car Logos

शेवर्ले –

शेवर्ले आणि कंपनीचे सह-संस्थापक विलियम सी. ड्युरेंट यांनी कंपनीचा असा बो-टाय लोगो बनविण्यासाठी कुठून प्रेरणा मिळाली याविषयी वेगवेळी मते आहे. त्यांच्या मुलीचे म्हणणे आहे की, त्यांनी सहजच हा लोगो तयार केला. तर दुसऱ्या माहितीनुसार, 1912 मध्ये वर्जिनियाच्या हॉट स्प्रिंग्समध्ये सुट्टीवर गेलेले ड्युरेंट आणि त्यांच्या पत्नी कॅथरिनने एका वृत्तपत्राच्या जाहिरातीमध्ये हा लोगो पाहिला व तेथून घेतला. अथवा त्यांचे भागिदार आणि स्विस कारचालक लुई शेवर्लेच्या जन्मस्थानाच्या सन्मानार्थ स्विर्झलँडच्या ध्वजाप्रमाणे दाखवण्यात आला आहे.

Image Credited – Cars Brands

मर्सिडिज बेंझ –

Daimler-Motoren-Gesellschaft ने आपल्या जर्मन ऑटोमोबाईलसाठी 1909 मध्ये स्टार लोगोची एक जोडीला ट्रेडमार्क केले होते. ज्यात एका तीन खांब होते व दुसऱ्यात चार खांब असलेला स्टार होता. मात्र त्याचा कधी उपयोग करण्यात आला नाही.

Image Credited – GrabCAD

साब –

पौराणिक लाल ग्रिफ्रिनच्या डोक्यावर सजवण्यात आलेला सोन्याचा मुकूट स्केनिया अथवा स्केन, स्वीडिश कार आणि ट्रक निर्माता एबी स्केनिया-वाबिसच्या मूळस्थानाचे प्रतिनिधित्व करतो. याचे 1969 मध्ये साब ऑटोमोबाईल सोबत विलिनिकरण करण्यात आले. 2000 मध्ये जीएमने साब खरेदी केल्यावर त्यासाठी पुन्हा लोगो डिझाईन करण्यात आला. करारानुसार दोन्ही कंपन्यांनी ग्रिफिन लोगोचा वापर केला. मात्र लोगोचा ट्रेडमार्क मालकी हक्क स्केनियाकडेच राहिला.

Image Credited – Car Logos

वोल्वो –

हा लोगो रोमन देवता मंगळाचे प्रतिक असलेले शस्त्र आणि युद्धासोबत जोडलेला आहे आणि लोखंडासाठी किमयागाराचे प्रतिक देखील आहे. 1920 पासून कंपनी हा लोगो वापर आहे.

Image Credited – Wallpaper Cave

मसेर्ती –

या इटालियन कंपनीचे नेतृत्व तीन मसेर्ती भाऊ करत असे. मात्र त्यांचा कलाकार असलेल्या चौथ्या भावाने हा लोगो तयार केला आहे. त्याने बोलोग्नामध्ये पियाजा मॅगीगोर येथील रोमन देवता नेपच्युनच्या प्रतिमेच्या आधारावर त्रिशूल डिझाईन केले.

Image Credited – YouTube

पोर्शे –

पोर्शेचा लोगो शस्त्रांचे दोन कोट दर्शवतो. पहिले पश्चिम जर्मनीमधील वुर्टेंबर्गचे फ्री स्टेट आणि दुसरे त्याची आधीची राजधानी स्टटगार्ट.

Image Credited – Pinterest

फेरारी –

इटालियन रेसकार ड्राइव्हर एनजो फेरारीला लढाऊ पायलट आणि जागतिक युद्धाचे नायक काउंट फ्रांसेस्को बाराकाला सन्मानित करण्यासाठी आपल्या वाहनावर एक घोड्याचे चित्र तयार करण्यास सांगितले होते. बाराकाने आपल्या विमानावर असेच एक घोड्याचे चित्र लावले होते. फेरारीने 1929 मध्ये स्केडिरिया फेरारी टीमची स्थापना केली व घोडा प्रतिक म्हणून ठेवले.

Image Credited – newsfirst

मित्सुबिशी –

जापानमध्ये मित्सुचा अर्थ तीन होतो व हिशी अथवा बिशी वॉटर चेस्टनट प्लांटला दर्शवतो. मित्सुबिशी लोगोमध्ये त्याचे संस्थापक योटोरो इवासाकी आणि यमनोचीचा संदर्भ दिसतो.

Image Credited – American Car Brands

प्यूजो –

ही कंपनी सुरूवातीला स्टील उत्पादन, उपकरण आणि सायकल निर्मितीमध्ये उतरली होती. नंतर 1890 मध्ये कंपनीने ऑटोमोबाईलचे निर्माण सुरू केले. सिंहाचा लोगो 1905 मध्ये सर्वात प्रथम वापर करण्यात आला.

Image Credited – Wallpaper Cave

रॉल्स रॉयस –

असे समजले जाते की, या कंपनीच्या कारच्या फ्रंट गिलवर दिसणारा स्पिरिट ऑफ एक्स्टसी अभिनेत्री एलेनर थॉर्नटनवर आधारित द व्हिस्परर नावाच्या मुर्तीकलेवर घेण्यात आला आहे. मुर्तीकार चार्ल्स सायक्सला रॉल्स रॉयसचा लोगो बनविण्याचा जबाबदारी देण्यात आली होती. सायक्सला थॉर्नटनला आपल्या संग्रहात वापर करण्यास सांगण्यात आले होते.

Image Credited – Car Logos

क्रिसलर –

क्रिसलरचा लोगो 1925 पासून विविध ठिकाणी वापरण्यात येत आहे. हे रोमन देवता बुधला दर्शवते.

Image Credited – Logonoid

अल्फा रोमियो –

हा एक आश्चर्यकारक लोगो आहे. यामध्ये क्रॉस आणि एक सापाचा संबंध इटलीच्या मिलान शहर आणि त्यावर एकेकाळी शासन करणारे कुटूंब विस्कोन्टीसशी जोडला जातो.

Image Credited – Money Inc

लेबोर्गिनी –

असे सांगितले जाते की, या कंपनीच्या स्थापनेविषयी विचार सुरू असताना याचे संस्थापक फेरूसिओ लेम्बोर्गिनी मिउरा रँचवर होते. तेथे बुलफाइटिंगसाठी बैलांना तयार केले जात असे. तेथूनच या लोगोची कल्पना आली असावी.

Leave a Comment