ओप्पोने लाँच केले दोन दमदार स्मार्टफोन

(Source)

टेक कंपनी ओप्पोने ए सीरिज मधील ए91 आणि ए8 हे स्मार्टफोन चीनच्या बाजारात लाँच केले आहेत. युजर्सला दोन्ही फोनमध्ये एचडी स्क्रीन, दमदार प्रोसेसर आणि कॅमेरा सपोर्ट मिळेल.

ओप्पो ए91 किंमत आणि स्पेसिफिकेशन –

कंपनीने ए91 च्या 8जीबी आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,999 युआन (जवळपास 20 हजार रुपये) ठेवली आहे. हा फोन रेड, ब्लू आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.

(Source)

कंपनीने या फोनमध्ये 6.4 इंच फूल एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिजॉल्युशन 1080×2400 पिक्सल आहे. सोबतच फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हिलीयो पी70 चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. स्क्रीन गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसोबत येईल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात क्वाड कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 48 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा मिळेल. त्या व्यतरिक्त 8 मेगापिक्सल वाइड अँगल आणि इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4जी VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. फोनमध्ये 4,000 एमएएचची बॅटरी मिळेल, जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल.

(Source)

ओप्पो ए8 ची किंमत आणि फीचर्स –

ऑप्पो ए8 च्या 4जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,199 युआन (जवळपास 12 हजार रुपये) आहे. या फोनमध्ये 6.5 इंच एचडी+ डिस्प्ले मिळेल. ज्याचे रिजॉल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. कंपनीने यात चांगल्या परफॉर्मेंससाठी ऑक्टाकोर मीडिया हिलीयो पी35 प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्राईड 9.0 पायवर काम करतो.

फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 12 मेगापिक्सलचा प्रायमेरी कॅमेरा व इतर 2 कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. फ्रंटला 8 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीचे फीचर ओप्पो ए91 प्रमाणेच आहेत. केवळ यात बॅटरी 4,230 एमएएच देण्यात आलेली आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment