या व्यक्तीने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आगीपासून वाचले 11 जणांचे प्राण

दिल्लीच्या राणी झांसी रोडवर रविवारी भीषण आगीत 43 जणांना प्राण गमवावे लागले. जर फायर फायटर राजेश शुक्ला यांनी स्वतःच्या जिवाला धोक्यात घालून 11 लोकांचे प्राण वाचवले नसते, तर हा आकडा अधिक वाढला असता. लोकांना वाचवताना राजेश देखील जखमी झाले व त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

खऱ्या आयुष्यातील हिरो असलेले राजेश शुक्ला सध्या दिल्लीच्या लोक नायक हॉस्पिटलमध्ये भर्ती आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जर त्यांना वेळीच या गोष्टीची माहिती मिळाली असती तर त्यांनी आणखी लोकांचे प्राण वाचवले असतात. त्यांनी लोकांना आवाहन केले की, आग लागण्याची माहिती त्वरित अग्निशामक दलाला द्यावी, जेणेकरून वेळेत त्यावर नियत्रंण मिळवता येईल.

https://twitter.com/kunal_rajchitte/status/1203686569095376896

सोशल मीडियावर राजेश यांच्या या बहादुरीचे जोरदार कौतूक केले जात आहे.

(Source)

राजेश शुक्ला हे झारखंडचे आहेत. 2004 पासून ते दिल्लीतील अग्निशामक दलात काम करत आहेत. सध्या ते जुन्या दिल्लीतील अग्निशामक केंद्रात असिस्टेंट डिव्हिजन ऑफिसर आहेत. 2001 मध्ये गुजरातमध्ये झालेला भुकूंप आणि दिल्लीत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

Leave a Comment