सर्वसाधारणपणे बाजारात 40 ते 50 रुपयात एक डझन केळी मिळतात. मात्र अमेरिकेतील मिआमी येथे एक केळ तब्बल 85 लाखांना विकले गेले आहे. अमेरिकेतील मिआमी येथे आर्ट बेसल येथे भितींवर टेप लावून चिकटवलेले केळे तब्बल 85.31 लाखांना विकले गेले. सोशल मीडियावर याचा फोटो व्हायरल होत आहे.
अरेच्चा ! भितींवर चिटकवलेले एक केळ विकले गेले तब्बल 85 लाखांना
हे एक आर्ट आहे. या आर्टला इटलीचे कलाकार मॉरिजियो कॅटेलन यांनी तयार केले आहे. त्यांनी बनवलेले तीनमधील दोन केळी विकली गेली आहेत, तर तिसऱ्या केळीची किंमत 1.07 कोटी रुपये ठेवण्यात आलेली आहे.

पेरोटिन गॅलरीनुसार, कॅटेलन आपल्या हॉटेलच्या खोलीत लटकवण्यासाटी एखादी मुर्ती तयार करण्याचा विचार करत होते. सुरूवातीला त्यांनी तांबे आणि तांब्यांच्या रंगाने पेंटे केलेले केळ तयार केले आणि त्यानंतर खरे केळ भितींवर टेप लावून चिटकवले.

हे केळ मिआमीच्या एका ग्रोसरी स्टोरमधून खरेदी करण्यात आले होते. या केळी आर्टला कॉमेडियन नाव देण्यात आलेले आहे. पेरोटिन गॅलेरीचे मालक इमॅन्युअल पेरोटिन यांच्यानुसार, केळे जागतिक व्यापाराचे प्रतिक आहे. कलाकार मॉरिजियो कॅटेलन यांनी याआधी 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट देखील बनवले होते.
