ही व्यक्ती हजारो वर्ष जुन्या पद्धतीने बदलत आहे लोकांचे आयुष्य

सरकारी नोकरीपासून ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी उमेदवाराच्या व्यक्तीमत्वाची चाचणी घेतली जाते. तुमचे व्यक्तिमत्वाची यश व अपयशात महत्त्वाची भूमिका असते. याच कारणामुळे व्यक्तिमत्व विकासाचे अनेक क्लासेस देखील असतात. अनेक संस्था पर्सेनेलिटी डेव्हल्पेमंटच्या नावाखाली हजारो रुपये घेतात.

(Source)

मात्र एक व्यक्ती अशी आहे जी, व्यक्तिमत्व विकासासाठी हजारो वर्ष जुन्या पद्धतीचा वापर करते. ही पद्धत लोकांना एवढी आवडत आहे की, त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत दरदिवशी वाढ होत आहे.

या व्यक्तीचे नाव नवीन तोश्नीवाल असे आहे. 51 वर्षीय नवीन हे जयपूर येथे राहतात. ते आधी केमिकल इंजिनिअर होते. नवीन आता व्यापारी आहेत. ते लोकांचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी मदत करतात.

(Source)

या पद्धतीचे नाव ग्राफो एनालिसिस (Grapho Analysis) असे आहे. नवीन सांगतात की, हे तंत्र 2000 वर्ष जुने आहे. हा तो काळ होतो जेव्हा ग्रीक फिलोसॉफर एरिस्टॉटलने मनुष्याचा मेंदू आणि त्यांच्या लिखावटीच्या मधील संबंध शोधला होता.

(Source)

नवीन सांगतात की, हँडरायटिंग एक प्रकारे माइंड रायटिंग आहे. आपले लिखाण कागदावर अवचेतन मनाचे (Sub Conscious mind) प्रतिबिंब उमटवते. त्यामुळे लिखाणाद्वारे आपण आपल्या मनात देखील बदल घडवू शकतो. एखाद्या व्यक्तीने 3 ते 4 आठवडे दररोज 5-7 मिनिटे लहान व सामान्य बदलांची प्रॅक्टिस केली, त्या त्याच्या व्यक्तीमत्वात बदल नक्की होईल.

(Source)

नवीनने सांगितले की, कोणत्याही व्यक्तीच्या लिखाणावरून त्याची बुद्धिमत्ता, दृढनिश्चय, इच्छाशक्ती, रचानात्मकता, एकाग्रता या सारख्या क्षमताची माहिती मिळते. या सर्व गोष्टी मिळून दाखवतात की व्यक्तीचे चरित्र कसे आहे.

नवीन यांना या पद्धतीचा वापर करण्यासाठी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद कडून प्रशंसा पत्र देखील मिळालेले आहे.

Leave a Comment