ऐरावतेश्वर मंदिराच्या पायऱ्यातून झरते संगीत


हिवाळ्याचे दिवस म्हणजे मस्त भटकंतीचे दिवस. त्यात कुणाला खास वास्तुकलेत रस असेल तर त्या पर्यटकांनी या जागेला नक्कीच भेट दिली पाहिजे. येथे तुम्हाला जगप्रसिद्ध वास्तुकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळेलच पण धार्मिक पर्यटनाच्या आनंद सुद्धा उपभोगता येईल. तमिळनाडू मधील १२ व्या शतकात बांधले गेलेले ऐरावतेश्वर मंदिर हे ते ठिकाण असून युनेस्कोने त्याचा जागतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे. हे मंदिर शिवाला समर्पित आहे.

१२ व्या शतकात चोल राजा जिवंत चोल याच्या काळात हे भव्य आणि अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले असून मंदिरावर केले गेलेले कोरीव काम अप्रतिम आहे. येथील वैशिष्ट म्हणजे येथे दगडात बांधल्या गेलेल्या पायऱ्या. या पायऱ्यांवर थोड्या जोरात पावलाचा आघात केला तर त्यातून विविध सूर ऐकू येतात. म्हणजे येथे दगडाला बोलते केलेले आहे.


मंदिराच्या दक्षिणपश्चिम कोपऱ्यात चार तीर्थ मंडप असून त्यावर मृत्युदेव यम याची प्रतिमा आहे. मंदिरात सहसा यमदेवाचे दर्शन होत नाही. पण पौराणिक कथेप्रमाणे यमाला एका ऋषींनी शाप दिला होता आणि त्यामुळे त्याचा शरीराची आग होत होती. या मंदिरात यमाने तीर्थस्नान करून शिवाची पूजा केली आणि त्याच्या शरीराची आग थांबली असे सांगतात. त्यामुळे येथे यमाची मूर्ती आहे तसेच त्याच्याच बाजूला सात आकाशीय देवतांच्या अतिशय सुबक आणि देखण्या मूर्ती आहेत.

असेही सांगतात की देवांचा राजा इंद्राचे वाहन ऐरावत हत्ती याने या मंदिरात शिव उपासना केली होती. त्याच्यावरून या मंदिराला ऐरावतेश्वर असे नाव पडले आहे.

Leave a Comment