6 वर्षीय मुलीने डोळ्यांवर पट्टी बांधून 2 मिनिटात सोडवले रूबिक क्यूब

6 वर्षीय मुलीला तामिळनाडूला क्यूब असोसिएशनने जगातील सर्वात लहान जिनियसचा खिताब दिला आहे. सारा नावाच्या 6 वर्षीय मुलीने डोळ्यांवर पट्टी बांधून कविता म्हणत म्हणत 2 मिनिट 7 सेंकदात 2X2 रूबिक क्यूब सोडवले. साराच्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. सारा वेल्लामल स्कूलमध्ये पहिलीत शिकत आहे. खास गोष्ट म्हणजे साराने केवळ 4 महिने आधीच रूबिक क्यूबसोबत खेळण्यास सुरूवात केली आहे.

तिच्या शिक्षकांचे म्हणणे आहे की, साराचा आयक्यू तिच्या वयाच्या मुलांपेक्षा अधिक आहे. रूबिक क्यूब सोडवण्यासाठी तिला आतापर्यंत पाच पुरस्कार मिळाले आहेत. तिला कविता वाचायला देखील आवडते.

याआधी 20 मे 2019 ला एका 20 वर्षीय युवकाने पाण्याच्या यात रूबिक क्यूब सोडवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. मुंबईच्या चिन्मय प्रभूने देखील केवळ 28 सेंकदात रूबिक क्यूब सोडवले होते.

 

Leave a Comment