याला म्हणतात ‘जुगाड’, सर्व सुखसोयीनिशी उपलब्ध आहे ही रिक्षा

प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी मुंबईतील एका रिक्षाचालकाने भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. सत्यवान गिते नावाच्या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षात सर्व गरजेच्या सोयी-सुविधा दिल्या आहेत. या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षाला असे हटक्या स्टाईलमध्ये बदलले आहे की, ट्विंकल खन्नाने देखील याचा फोटो शेअर केला.

या रिक्षात अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वॉशबेसिनपासून ते चार्जिंग पॉइंटपर्यंत अनेक सुविधा आहेत. रिक्षामध्ये छोटी छोटी रोपटी देखील ठेवण्यात आलेली आहेत.

ट्विंकल खन्ना फोटो शेअर करत ‘जुगाड ऑफ हॉल ऑफ फेम’ असे म्हटले.

https://twitter.com/utkarshkg/status/1197267518534176768

प्रवाशांना आरामदायी व लग्झरी प्रवास देण्यासाठी आपल्या रिक्षामध्ये केलेला हा बदल नेटकऱ्यांना देखील भलताच आवडला. नेटकऱ्यांनी देखील सत्यवान गिते यांचे कौतूक केले व ही खरचं भारी कल्पना असल्याचे म्हटले.

गिते म्हणाले की, रिक्षात फोन चार्ज करता येतो. याशिवाय स्वच्छ पाणी आणि वॉशबेसिन देखील आहे. याशिवाय 1 किमीच्या आतील प्रवासासाठी वृद्ध प्रवाशांकडून पैसे देखील घेत नाही. प्रवाशांना चांगली सर्विस मिळावी यासाठी हे केले आहे.

ट्विंकल खन्नाने फोटो शेअर केला याविषयी विचारले असता ते म्हणाले की, मला त्याबद्दल माहिती नाही; पण मला आश्चर्य वाटत आहे. मी त्यांचा आणि अक्षय कुमारचा मोठा फॅन आहे. कदाचित मला ट्विंकल खन्ना आणि अक्षक कुमार यांना भेटता आले असते.

Leave a Comment