या 12 वर्षीय मुलीची डोळ्यांवर पट्टी बांधून स्केटिंग करत विश्वविक्रमाला गवसणी

7 वी मध्ये शिकणाऱ्या ओजल नलावडे या मुलीने अशी कामगिरी केली आहे, ज्याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही. ओजलने डोळ्यांवर पट्टी बांधून सर्वात वेगवान स्केटिंग करण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीसाठी तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले आहे.

हुबली येथे राहणारी ओजल 12 वर्षांची आहे. तिने केवळ 51.25 सेंकदात डोळ्यांवर पट्टी बांधून स्केटिंगद्वारे 400 मीटर अंतर पुर्ण केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, ती जगातील सर्वात वेगवान ब्लाइंडफोल्डेड स्केटर आहे.

आपल्या कामगिरीविषयी ओजल म्हणाली की, मी खूप खूष आहे. माझे समर्थन करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद. माझे आई-वडिल, कोच आणि कुटूंब माझ्या पाठीशी राहिले. मी भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.

ओजलचे स्केंटिंग कोच सुर्यवंशी म्हणाले की, ती अनेक दिवसांपासून सकाळी नियमित सराव करत आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून स्केटिंग करणे खूपच दुर्मिळ आहे. ओजलने हे यश स्वतःच्या मेहनती आणि दृढ संकल्पाद्वारे मिळवले आहे.

ओजलचे वडिल खाजगी कंपनीमध्ये अधिकारी आहेत. गिनीज बुकच्या आधी तिच्या नावावर आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत.

Leave a Comment