
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सत्ता स्थापनेचा संघर्ष वाढतच आहे. सत्ता स्थापनेला भाजपने नकार दिल्यानंतर शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमिवर केंद्रातील मोदी सरकारमधून शिवसेना बाहेर पडत असून शिवसेनेचे अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी देखील राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.
मोदी सरकारची साथ सोडणार शिवसेना, केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार अरविंद सावंत
सावंत याबाबत ते ट्विट करून म्हणाले की, शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला लोकसभा निवडणुकी आधी ठरला होता. तो दोघांना मान्य होता. हा फॉर्म्युला आता नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपने फारकत घेतली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
