जगातील सर्वात हलकी मिठाई, 96 टक्के भाग हवेचा

मिठाईची आवड प्रत्येकालाच असते. भारतात तर असंख्य प्रकारच्या मिठाई बनतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा मिठाईबद्दल सांगणार आहोत, जी सर्वात वेगळी आहे.

ब्रिटनमध्ये सर्वात हलकी मिठाई तयार करण्यात आली आहे. या मिठाईची खास गोष्ट म्हणजे ही बनविण्यासाठी वैज्ञानिकांची मदत घेण्यात आलेली आहे. या मिठाईचे वजन केवळ 1 ग्रॅम आहे. या मिठाईचा 96 टक्के भाग हा केवळ हवा आहे.

(Source)

जगातील सर्वात हलकी मिठाई तयार करण्याची कामगिरी लंडनमधील डिझाईनर स्टुडिओ बॉमपास अँन्ड पारच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासाठी एरोजेलेक्स लॅबोरेटरीच्या वैज्ञानिकांची मदत घेण्यात आली. ही मिठाई बनविण्यासाठी सर्वात प्रथम वैज्ञानिकांनी सर्वात हलका ठोस पदार्थाला खाण्यायोग्य बनविले आणि त्यानंतर त्यात मिठाई भरली.

ही मिठाई ऐरोजेलपासून बनविण्यात आली असून, हा जगातील सर्वात हलका मात्र मजबूत पदार्थ आहे. याचा शोध 1931 मध्ये लागला होता. ऐरोजेलमध्ये 95 ते 99.8 टक्के हवा असते.

(Source)

ऐरोजेलची निर्मिती अनेक गोष्टींपासून होते, मात्र वैज्ञानिकांनी अंड्यातील ग्लोबुलर प्रोटीन एल्बमोइड्सचा प्रयोग केला. हे बनविण्यासाठी अंड्याचा पांढऱ्या भागापासून हाइड्रोजेल तयार करण्यात आले. त्यानंतर त्यापासून कॅल्शियम क्लोराइड पाण्यात मिसळून एका साच्यात टाकण्यात आले. तयार झालेल्या पदार्थामधून मॅरिग्यूजेलमधून तरल पदार्थ काढून लिक्विड कार्बन डायोऑक्साईडमध्ये बदलण्यात आले.

(Source)

ही सर्वात हलकी मिठाई 10 ते 26 ऑक्टोंबर 2019 दरम्यान सौदी अरेबियातील किंग अब्दुल अजीज सेंटर फॉर वर्ल्ड कल्चर येथे सादर करण्यात आली.

Leave a Comment