भारतीय बाजारपेठेत लवकरच दाखल होणार नोकियाचे स्मार्ट टिव्ही

मागील काही वर्षात बाजारात स्मार्ट टिव्हीची मागणी वाढली आहे. आता स्मार्ट फोन कंपन्या देखील स्मार्टटिव्हीची निर्मिती करत आहेत. वनप्लस, मोटोरोलानंतर आता नोकिया देखील स्मार्ट टिव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. आज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने नोकिया सोबत भागिदारीची घोषणा केलीअसून, कंपनी आता नोकियासोबत स्मार्ट टिव्हीची विक्री करणार आहे. मोटोरोलाने देखील याआधी फ्लिपकार्टसोबत मिळून भारतात टिव्ही लाँच केला आहे.

फ्लिपकार्टने म्हटले आहे की, या भागीदारीद्वारे भारतीय ग्राहकांची गरज समजण्यास मदत होईल. कंपनी याच आधारावर टिव्हीचे मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रिब्यूशन निश्चित करेल. असे सांगण्यात येत आहे की, या टिव्हीमुळे ब्रँडिंगसोडून नोकियाचा काहीही फायदा होणार नाही.

फ्लिपकार्टने प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, नोकिया ब्रँडचे स्मार्ट टिव्ही खास स्पीकर्ससोबत येतील. जे जेबीएल साउंड प्रोग्रामवर काम करतील. नोकिया स्मार्ट टिव्हीमध्ये अँड्राईड टिव्ही ऑपरेटिंग सिस्टम देण्यात येण्याची शक्यता आहे.

 

Leave a Comment