
मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणाचे सरकार येणार युतीमधील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मागील अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. ५०-५० फॉर्म्युल्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरु आहे. या दोन्ही पक्षांकडून दररोज वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच आता बुधवारी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शांत, थंड डोक्याने महाराष्ट्राच्या हिताचा विचार करुन काही निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी उद्धव ठाकरे समर्थ आहेत. सगळ ठरल्याप्रमाणे घडले तर येणार सरकार स्थिर असेल, अशी काहीशी मावळ भुमिका घेतली. त्यावरुनच राष्ट्रवादीने आता शिवसेनेला खडे बोल सुनावले आहे. शिवसेनेने आता वाघाच्या जागी शेळी लावली पाहिजे, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या रेखा फड यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा टोला ; शिवसेनेने वाघाच्या जागी आता शेळी लावावी
अखेर सत्तेसाठी @ShivSena ने @BJP4Maharashtra पुढे नांगी टाकलीच यांचा वाघ थंड झाला. आता वेळ आलीय शिवसेनेचा वाघ बदलून शेळी करायला पाहीजे, इतकी लाचारी,चला आता पुढील पाच वर्षं विकास कमी आणी यांची नौटंकी पाहायला महाराष्ट्रातील जनतेने तयार रहा! सगळे गाजरं @supriya_sule @Jayant_R_Patil pic.twitter.com/sUG2JdBwgh
— Rekha Phad (@RekhaPhadSpeaks) October 30, 2019
राऊत यांनी बुधवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे भले युतीत राहण्यातच आहे पण तो योग्य सन्मान राखाला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राऊत यांनी यावरुन मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली. राष्ट्रवादीच्या नेत्या फड यांनी यावरुनच ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टिका केली. अखेर शिवसेनेने सत्तेसाठी भाजपपुढे नांगी टाकलीच. शिवसेनेचा वाघ थंड झाला. आता वेळ आली आहे शिवसेनेचा वाघ बदलून शेळी करायला पाहीजे, एवढी लाचारी, चला पुढील पाच वर्ष आता विकास कमी आणि यांची नौटंकी पाहायला महाराष्ट्रातील जनतेने तयार रहा!, असे ट्विट फड यांनी केले आहे. फड यांनी या ट्विटमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांना टॅग केले आहे.
