पर्यावरण पुरस्कार स्विकारण्यास ग्रेटा थनबर्गचा नकार

स्वीडनची 16 वर्षीय पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने तिला देण्यात येणारा पर्यावरण पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला आहे. ग्रेटाने पुरस्कार न स्विकारण्याबद्दल म्हटले की, हवामान बदलासाठी विज्ञानाला ऐकण्याची गरज आहे, पुरस्काराची नाही.

ग्रेटाने सुरू हवामान बदलासंबंधी सुरू केलेले फ्रायडेज फॉर फ्युचर आंदोलनात जगभरातील शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. तिला स्टॉकहोमच्या नार्डिक काउंसिलने देखील सन्मानित केले आहे. ग्रेटला नॉर्वे आणि स्वीडनमध्ये केलेल्या आपल्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले होते. संघटनेद्वारे देण्यात येणारा वार्षिक पर्यावरण पुरस्कार ग्रेटाला देण्याची घोषणा करण्यात आली होती.

पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर थनबर्गच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ती हा पुरस्कार आणि तिला देण्यात येणारी 3,50,000 डेनिश क्रोनर (36,83,000 रूपये) रक्कम स्विकारणार नाही.

ग्रेटा थनबर्ग सध्या अमेरिकेत आहे. तिने इंस्टाग्रामवर लिहिले की, पर्यावरण आंदोलनासाठी कोणत्याही पुरस्काराची गरज नाही. आपल्यासाठी गरजेचे आहे की, जे नेते आज सत्तेत आहेत, त्यांनी विज्ञानाचे ऐकावे.

Leave a Comment