केरळमधील कोची शहरात देशातील पहिली वॉटर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. केंद्र सरकारने या प्रोजेक्टला पर्यावरणीय मंजूरी दिली आहे. ही वॉटर मेट्रो 16 मार्गांवर चालेल. याद्वारे कोचीच्या आजुबाजूला असलेल्या 10 द्वीपांवरील 38 टर्मिनलशी संपर्क होऊ शकेल.
लवकरच धावणार देशातील पहिली वॉटर मेट्रो
यातील 18 टर्मिनल हे मुख्य बोट हबच्या रूपात तयार करण्यात आले आहेत. डिसेंबर 2019 पासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
या प्रोजेक्टसाठी 819 कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. 78 किमी लांब मार्गावर दोन बोटयार्ड असतील. मेट्रोसाठी 78 इको-फ्रेंडली, वेगवान आणि एअर कंडिशड बोटी तयार करण्यात आल्या आहेत. या प्रोजेक्टमध्ये जर्मन बँक केएफडब्ल्यूने आर्थिक सहाय्यता केली आहे.
