
मुंबई – हळूहळू महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीचे निकाल आज स्पष्ट होत आहेत. या पार्श्वभुमीवर पत्रकार परिषद घेत भाजपला महाराष्ट्रात जनतेकडून मिळालेल्या पाठिंब्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. तसेच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार असल्याचा निर्णय दिला आहे. पण विजयाचा आनंद साजरा करण्याची आताची वेळ आहे. त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे घटकपक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचा दावाः भावी मुख्यमंत्री महायुतीचाच
भाजप-शिवसेना पक्षाने 2019 च्या विधानसभा निवडणूकीसाठी एकत्रित निवडणूक लढण्याचा विचार केला. त्यापैकी भाजपने महाराष्ट्रातील 288 जागांपैकी 164 जागांवर निवडणूक लढवली पण त्यांना 26 टक्के मत मिळाल्याचे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. भाजपचा स्ट्राईक रेट यंदाचा 70 टक्के असून हा पक्षाच्या कार्यकाळातील एक ऐतिहासिक बाब आहे. पण फडणवीस यांनी परळी मधून पंकजा मुंडे आणि सातार येथून उदयनराजे यांचा पराभव हा धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. आता या पराभवावर पक्षाकडून अधिक विश्लेषण सुद्धा करण्यात येणार आहे. त्याचसोबत भाजप-शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी करण्यात आल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी कमी जास्त जागा झाल्या पण उत्तम कामगिरी केली आहे.
जनतेने विधानसभा निवडणूकीत सर्वात मोठे समर्थन भाजपला मिळाले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचसोबत विरोधी पक्ष येत्या पुढील काळात सक्षमतेने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच अपक्ष आणि इतरमधील 15 जण महायुतीसोबत येणार असल्याचे फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
