प्रवाशांच्या वर्तणुकीमुळे त्रासल्या आहेत तेजस एक्स्प्रेसच्या होस्टेसेस


या महिन्याच्या 4 ऑक्टोबरपासून सुरू झालेली तेजस एक्सप्रेस आपल्या सुविधांमुळे चर्चेत आहे. ही रेल्वे आयआरसीटीसी आणि भारतीय रेल्वेचा भाग असूनही ती भारताची पहिली ‘खासगी ट्रेन’ म्हणून संबोधली जात आहे.

विमानाच्या एअर होस्टेसच्या धर्तीवर तेजसमध्ये रेल होस्टेस अस्तित्त्वात आहेत. प्रवाशांच्या आरामदायी प्रवास लक्षात घेऊन ही यंत्रणा अवलंबली गेली आहे. सीटशेजारील बटण दाबल्यावर रेल्वेची होस्टेस प्रवाश्याकडे जाऊन त्यांची मदत करते.

बीबीसीच्या वृत्तानुसार, प्रवाशांनी या रेल्वे होस्टेसना विनाकारण त्रास देणे सुरू केले आहे. काही लोक अनावश्यकपणे बटण दाबून कॉल करतात. काही खाद्य देताना, ते त्यांच्या संमतीशिवाय व्हिडिओ तयार करतात किंवा सेल्फी घेण्यास प्रारंभ करतात. नोकरी हातून जाऊ नये म्हणून त्या चकार शब्द ही बोलत नाही.

काही रेल्वे प्रवाशांनी त्यांच्या पश्चिमात्य कपड्यांबाबतही आक्षेप नोंदविला आहे, ट्विटरवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना त्यांचा ड्रेसकोड साडी करावा, अशी विनंती केली आहे.

हे सर्व असूनही, तेजसमध्ये कार्यरत होस्टेस त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक आहेत आणि हसत हसत प्रवाशांचे वाईट वागणे देखील टाळत आहेत.

Leave a Comment