अलिबाबा ग्रुपवर दररोज होत आहेत 30 कोटी सायबर हल्ले

चीनमधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या अलिबाबा ग्रुपवर दररोज 30 कोटी सायबर हल्ले होत आहेत. असे असले तरी ग्रुपची पेमेंट कंपनी अलीपे ला हॅकर्स कोणतेही आर्थिक नुकसान पोहचवू शकले नाहीत. अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांनी याविषयी स्पष्ट केले की, एवढ्या सायबर हल्ल्यानंतर देखील ग्राहकांना कोणतेही नुकसान झालेले नाही. ते सिंगापूरमधील फॉर्ब्स ग्लोबल सीईओ काँफ्रेंसमध्ये बोलत होते.

त्यांनी सांगितले की, सध्या अलीपेचे एक अब्ज युजर्स आहेत. त्यामुळे दररोज 50 अब्ज डॉलरची देवाणघेवाण होत असते. फेब्रुवारीमध्ये अलिबाबा ग्रुप समुहावर करण्यात आलेल्या सायबर हल्यामुळे कंपनीची ई-कॉर्मस साईट ताओबाओच्या दोन कोटी ग्राहकांची खाती धोक्यात आली होती.

मात्र नवीन आणि हायटेक तंत्रज्ञानामुळे या गोष्टीची त्वरित माहिती मिळाली. कंपनीने या हल्ल्याचे नुकसान सहन केले असून, ग्राहकांचे कोणतेही नुकसान होऊ दिले नाही. जॅक मा म्हणाले की, इंटरनेटवर फसवणूक करणाऱ्या घटना रोखण्यासाठी मनुष्यापेक्षा मशीन अधिक कार्यक्षम आहे.

जॅक मा यांनी मागील महिन्यातच अलीबाबा ग्रुपच्या चेअरमन पदावरून निवृत्ती घेतली आहे.

Leave a Comment