
कोलकाता – भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी चिंता व्यक्त करत भारतीय अर्थव्यवस्था डगमगली असून सध्याच्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल, असे वाटत नसल्याचे मत अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते आणि भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
नोबेल विजेते बॅनर्जींनी भारतीय अर्थव्यवस्थेवर व्यक्त केली चिंता
मला नोबल पुरस्कार मिळाल्यचे माहित झाल्यानंतर मी ४० मिनिटे झोपलो. मला माहित होते, जर मी जागा राहिलो तर मला भरपूर फोन येतील. मी माझ्या आईशी आतापर्यंत बोलू शकलो नाही. लवकरच तिच्याशी मी बोलेन. मला कधीच वाटले नव्हते की, एवढ्या लवकर हा पुरस्कार मिळेल, असे त्यांनी सांगितले.
मूळ भारतीय वंशाचे असलेले अभिजित बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल मिळाला आहे. हा नोबेल त्यांना पत्नी इस्थर डफ्लो आणि अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांच्यासमवेत संयुक्तपणे मिळाला आहे. बॅनर्जी हे अमेरिकेमधील एमआयटीच्या फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत.
