पोटात दुखत असल्याने डॉक्टरांनी 2 युवकांना करायला सांगितली चक्क प्रेग्नेंसी टेस्ट

झारखंडच्या एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा दर्शवणारा एक प्रकार समोर आला आहे. राज्यातील सिमरिया रेफरल हॉस्पिटलमध्ये पोटात दुःखत असल्याने दोन पुरूष रूग्ण डॉक्टर मुकेश कुमार यांच्याकडे गेले होते. आरोप आहे की, डॉक्टरांनी त्या दोघांना प्रेग्नेंसी टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांद्वारे लिहिण्यात आलेल्या चिठ्ठीमध्ये एएनसी म्हणजेच एंटी नेटल चेकअप लिहिण्यात आलेले आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर विभागातील सिव्हिल सर्जनने चौकशीचे आदेश दिले आहेत.

गोपाल गंझू आणि कामेश्वर गंझू दोन रूग्ण –

सिमरियाच्या चोरबोरा गावात राहणाऱ्या गोपाल गंझू आणि कामेश्वर गंझू पोट दुखःत असल्याची तक्रार घेऊन रेफर हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मुकेश होते. दोघांनाही त्यांनी प्रेग्नेंसी टेस्ट करण्याचा सल्ला दिला.

डॉक्टरांनी रूग्णांच्या चिठ्ठीवर एचआयव्ही, एचबीए, एचसीव्ही, सीबीसी, एचएच-2 आणि एएनसी चेकअप करण्याचा सल्ला दिला. दोन्ही रूग्णांसाठी एकाच प्रकारची औषधे देखील लिहिली. दोन्ही रूग्ण जेव्हा तपासणीसाठी प्रायव्हेट पैथोलॉजी लॅबमध्ये गेले, त्यावेळी या सर्व गोष्टींचा खुलासा झाला. लॅबने चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या इतर गोष्टींची तपासणी केली मात्र प्रेग्नेसीची टेस्ट केली नाही.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकारावर डॉक्टर मुकेश यांनी म्हटले आहे की, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून, चिठ्ठीवर ओव्हर रायटिंग करण्यात आलेली आहे.

 

Leave a Comment