भारतात 5 जीचा डेमो करणार ही कंपनी

चीनी स्मार्टफोन कंपनी ह्युवाईला अनेक दिवसांपासून अमेरिकेच्या प्रतिबंधाचा सामना करावा लागत आहे. यामुळे कंपनीला आता भारत सरकारकडून 5 जी नेटवर्क डेमोसाठी परवानगी मिळाली आहे. आता भारतीय लोकांना इंडिया मोबाईल काँग्रेस इव्हेंट 2019 दरम्यान 5 जी तंत्रज्ञानाचे ट्रायल बघायला मिळेल.

5 जी काय आहे ?

5 जी तंत्रज्ञान वायरलेस फोनची पाचवी पिढी आहे. 4 जीच्या तुलनेत 5 जी अधिक स्पीड देते. तसेच यामुळे युजर्सच्या डिव्हाईसची बॅटरी देखील कमी जाईल. 5 जी नेटवर्क एलटीईवर काम करेल. 2025 मध्ये जगभरातील अर्ध्या लोकसंख्येला या नेटवर्कचा सपोर्ट मिळेल.

भारत सरकारने दिली परवानगी –

भारत सरकारने ह्युवाईला 5 जी नेटवर्क डेमो करण्याची परवानगी दिली असली तरी ही कंपनी भारतात 5 जी सेवा पुरवणार की नाही याबाबत सरकारने काहीही स्पष्ट केलेले नाही. ह्युवाई एअरटेल आणि व्होडाफोनबरोबर मिळून 5 जी नेटवर्कचे ट्रायल सादर करण्याची शक्यता आहे.

ह्युवाई इंडियाचे मुख्य अधिकारी जय चैन यांनी आयएमसी इव्हेंटसाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. रिपोर्ट्सनुसार, नोकिया आणि एरिक्सन देखील या इव्हेंटमध्ये 5 जी नेटवर्क सादर करू शकतात.

 

Leave a Comment