
नाना पाटेकर यांचे नाव गेल्यावर्षी आलेल्या मी टुच्या वादळात अग्रस्थानी होते. नाना पाटेकर यांच्यावर बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. नाना पाटेकर यांची या आरोपांनंतर ‘हाऊसफुल ४’ चित्रपटातून तातडीने गच्छंती करण्यात आली.
लवकरच नाना पाटेकरांची सिनेसृष्टीत वापसी
नाना पाटेकर हे त्यानंतर जवळपास वर्षभराच्या अवधीनंतर चित्रपटात दिसणार आहेत. रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटात नाना पाटेकर यांनी शेवटचे काम केले होते. एका तमिळ स्पाय थ्रीलर चित्रपटात आता ते दिसणार आहेत. चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी चित्रपटाला नाना पाटेकर यांनी होकार दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
ते जयम रामीसोबत या चित्रपटात दिसणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा चित्रपट अक्षय कुमारच्या ‘बेबी’चा तामिळ रिमेक असण्याची शक्यता आहे. जवळपास ६० कोटींचे बजेट चित्रपटांचे असणार आहे.
