या योजनेद्वारे सहज मिळेल तुम्हाला हवा असलेला व्हीआयपी गाडी नंबर

जर तुम्ही तुमच्या जुन्या गाडीचा लकी नंबर नेहमी स्वतःजवळ ठेऊ इच्छित असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नेहमी बघितले जाते की, काही वर्ष गाडी वापरल्यानंतर लोक ती गाडी विकतात किंवा नवीन वाहनांबरोबर एक्सचेंज करतात. याचबरोबर गाडीचा नंबर देखील जातो. अनेकांसाठी आपल्या वाहनाचा नंबर हा लकी असतो. मात्र गाडी विकल्यावर हा नंबर तुमच्याकडून जातो. आता अशा लोकांसाठी देशभरात लवकरच वाहन नंबर पोर्टिबिलिटी योजना सुरू होणार आहे. या योजनेमुळे तुम्ही तुमच्या जुन्या गाडीचा नंबर तुमच्या नवीन गाडीसाठी पोर्ट करू शकता.

पोर्टिबिलिटीची योजना दिल्लीमध्ये आधीपासूनच सुरू असून, आता नोएडामध्ये देखील ही योजना सुरू होणार आहे. या योजनेमुळे जुन्या वाहनाचा नंबर कोणत्याही वाहनासाठी घेता येणार आहे. दुचाकी वाहनांसाठी 20 हजार रूपये आणि चारचाकी वाहनांसाठी 50 हजार रूपये अतिरिक्त द्यावे लागतील. मात्र जुन्या गाडीसाठी जो नंबर मिळेल, त्यावर कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही. केवळ रजिस्ट्रेशन फी द्यावी लागेल.

पोर्टिबिलिटीसाठी दोन अटी –

उत्तर प्रदेश परिवहन विभागान नंबर पोर्टिबिलिटीसाठी दोन अटी ठेवल्या आहेत. ज्या जुन्या गाडीचा नंबर घ्यायचा आहे, त्याचे रजिस्ट्रेशन कमीत कमी तीन वर्ष गाडीच्या मालकाच्या नावे असायला हवे. दुसरी अट म्हणजे, ज्या नावाने जुन्या गाडीचे रजिस्ट्रेशन आहे त्याच नावाने नवीन वाहनाचे रजिस्ट्रेशन होईल.

लिलावात लकी नंबर मिळेल स्वस्त –

याचबरोबर व्हीआयपी नंबरसाठी लिलावात सहभागी झाल्यावर 1 लाख रूपये नंबरसाठी द्यावे लागतील. त्यानंतर जर कोणी बोली लावली तर रक्कम वाढवली जाऊ शकते.

 

 

Leave a Comment