पाकिस्तानात पुन्हा येऊ शकते लष्करी राजवट


इस्लामाबाद : संकटाचे वादळ पाकिस्तानातील इम्रान खान सरकारवर घोंघावू लागले असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १११ ब्रिगेडच्या सुट्ट्या पाकिस्तान सेनेचे प्रमुख जनरल बाजवा यांच्या आदेशानंतर रद्द करण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, १११ ब्रिगेडचा वापर इतिहासात नेहमी सत्ताबदलासाठी केला गेला आहे. पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांसोबत जनरल बाजवा यांनी गुप्त बैठक केल्याचीही सूत्रांची माहिती आहे. हे दोन्ही घटनाक्रम पाहता पाकिस्तानात लवकरच सत्ताबदलाचे संकेत मिळत आहेत.

गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्व सैनिकांना ड्युटीवर परतण्याचे आदेश देण्यात आले. रावळपिंडीमध्ये पाकिस्तान सेनेची १११ ब्रिगेड तैनात असते. पाकिस्तान सेनेच्या हेडक्वार्टरची ही ‘गॅरिसन ब्रिगेड’ आहे. यापूर्वी या ब्रिगेडचा वापर जवळपास प्रत्येक सैन्य सत्ताबदलात करण्यात आला असल्यामुळेच या ब्रिगेडला ‘तख्तपालट ब्रिगेड’ही म्हटले जाते.

पाकिस्तानी सेनेकडूनच इम्रान खान यांना गादीवर बसवण्यात आले आहे, परंतु, सध्या मात्र त्यांनी पाकिस्तानी सेना त्यांच्यावर नाराज आहे. इम्रान खान यांनी भारतात जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर ज्यापद्धतीने हा मुद्दा हाताळला त्यावर पाकिस्तानी सैन्य नाखुश आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानची बाजू मांडण्यात इम्रान खान अपयशी ठरल्याचेही चित्र दिसत असल्यामुळेच पाकिस्तानी सेना पुन्हा एकदा देशाची सत्ता आपल्या हातात घेण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment