1250 किलो प्लास्टिकपासून बनविला जगातील सर्वात मोठा चरखा

उत्तर प्रदेशच्या नोएडा प्राधिकरणाने 1250 किलो प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर करून 1650 किलो वजनाचा गांधीजींचा चरखा बनवला आहे. हा चरखा 14 फूट उंच आणि 8 फूट रूंद आहे. या चरख्याला सेक्टर-94 येथील महामाया फ्लायओवरच्या जवळ ग्रीन एरियामध्ये लावण्यात आले आहे. गौतम बुध्द नगरचे खासदार महेश शर्मा आणि नोएडाचे आमदार पंकज सिंह यांनी मंगळवारी या चरख्याचे अनावरण केले.

नोएडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा चरखा गांधीजींचे स्वप्न असलेल्या स्वदेशीचे प्रतिक आहे. हा प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवण्यात आलेला जगातील सर्वात मोठा चरखा आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा चरखा लोकांमध्ये प्लास्टिकच्या योग्य वापराविषयी जागृकता पसरवण्यासाठी उपयोगी ठरेल.

2 ऑक्टोंबरला महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सिंगल युज प्लास्टिक वस्तूंवर देखील सरकार बंदी घालणार आहे.

 

Leave a Comment