आधारद्वारे रिटर्न फाइल करणाऱ्यांना आयकर विभागाकडून पॅन कार्ड


आयकर विभाग आधारद्वारे रिटर्न फाइल करणाऱ्यांना स्वतः पॅनकार्ड प्रदान करणार आहे. यासाठी रिटर्न फाइल करणाऱ्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. सीबीडीटीनुसार, हा निर्णय पॅनकार्ड आणि आधारकार्डला लिंक करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेला आहे. हा नियम एक डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

सांगण्यात आले आहे की, जर एखादी व्यक्ती आधारद्वारे रिटर्न फाइल करत असेल तर, समजण्यात येईल की, ती व्यक्ती पॅन कार्ड मिळवण्यासाठी देखील अर्ज करत आहे. अशावेळेस त्या व्यक्तीला दुसरे कोणतेही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. आयकर विभाग पॅनकार्ड देण्यासाठी त्या व्यक्तीची माहिती युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून घेईल.

सीबीडीटीचे अध्यक्ष पीसी मोदी यांनी याआधी देखील सांगितले होते की, जर एखादी व्यक्ती पॅनकार्ड नसेल म्हणून, आधारद्वारे रिटर्न भरत असेल तर आम्ही त्या व्यक्तीला पॅन कार्ड देण्याविषयी विचार करत आहोत. कायद्यानुसार, रिटर्न तपासणारा अधिकारी स्वतः पॅन कार्ड प्रदान करू शकतो.

आतापर्यंत 120 करोड पेक्षा अधिक आधार नंबर देण्यात आलेले आहेत. तर 41 करोड पॅनकार्ड प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 22 करोड पॅनकार्ड आधारशी जोडण्यात आलेले आहेत.

Leave a Comment