कसोटीत टेक्निकला वाजवीपेक्षा जास्त महत्व – राहूल

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात लोकेश राहुल चांगल्या सुरूवातीनंतर देखील मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. त्याने पहिल्या डावात 44 तर दुसऱ्या डावात 38 धावा केल्या. आपल्या या खेळींविषयी बोलताना राहुल म्हणाला की, टेक्निक सर्व काही असल्याचे सांगितले जाते. मात्र मात्र धावा करण्यासाठी संयम ठेवणे गरजेचे असल्याचे त्याने मान्य केले आहे.

अफगाणिस्तानविरूध्द झालेल्या एकमेवर कसोटी सामन्यात अर्धशतक आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये 149 धावा या व्यतरिक्त लोकेश राहूल 2018 पासून कसोटमीमध्ये मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला आहे.

लोकेश राहुल म्हणाला की, टेक्निक आणि बाकी गोष्टींबाबत सांगितले जाते. मात्र जेव्हा तुम्ही धावा करता सर्व काही चांगल दिसत असते. त्यामुळे माझ्यासाठी क्रिजवर जास्त वेळ घालवणे गरजेचे आहे.

त्याने सांगितले की, मी खूप निराश आहे, पण काही गोष्टी मी योग्य देखील करत आहे. मला केवळ संयम ठेवला पाहिजे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आपल्या पहिल्याच मालिकेत त्याने 110 धावांची शानदार खेळी केली होती. मात्र त्यानंतर त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नव्हती.

Leave a Comment