प्रियंकाची आयुष्मानने केली पाठराखण


बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी पाकिस्तानी मंत्र्याने केली होती. युनिसेफला पत्र लिहून प्रियंका चोप्राला ‘सदिच्छा दूत’ या पदावरुन हटवण्याची विनंती पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी यांनी केली होती. त्यावरुन प्रियंका चोप्रा भारताचे प्रतिनिधीत्व योग्य पद्धतीने करत आहे असे वक्तव्य बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना राणावतने करत तिला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता प्रियंकाची अभिनेता आयुष्मान खुरानाने देखील पाठराखण केली आहे.

‘अंधाधून’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने आयुष्मानला सन्मानित करण्यात आले. त्याने या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. आयुष्मानने या पार्टीदरम्यान आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व प्रियंका खूप चांगल्या प्रकारे करत आहे. केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी ती एक आदर्श आहे. एका लष्कर अधिकाऱ्याची मुलगी असण्याच्या नात्याने ती भारताचे प्रतिनिधीत्व खूप चांगल्या प्रकारे करत असल्याचे आयुष्मान म्हणाला आहे.

काश्मीर प्रश्नी भारत सरकारच्या भूमिकेचे तसेच पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचे प्रियंका चोप्राने जाहीर समर्थन केले होते. युनिसेफची सदिच्छा दूत या नात्याने तिने शांततेचा पुरस्कार केला पाहिजे. पण तिची भूमिका या तत्वांच्या पूर्णपणे विरोधात असल्यामुळे या पदावरुन तिला हटवावे अशी मागणी शिरीन मझारी यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

Leave a Comment