टीम इंडियाच्या मास्तरपदी पुन्हा ‘शास्त्री’बुवाच


कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून  रवी शास्त्री यांची निवड केली आहे. कर्णधान विराट कोहलीचे समर्थन असल्याने शास्त्री यांची निवड होईल हे निश्चित झाले होते. त्यांची पुढील दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असून, आता त्यांचा कार्यकाळ 2021 मध्ये  भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापर्यंत असणार आहे.

शास्री यांचा भारतीय संघाबरोबरील चौथा कार्यकाळ आहे. ते 2007 मध्ये बांग्लादेश दौऱ्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यानतर 2014 ते 2016 मध्ये संघाचे संचालक होते आणि 2017 के 2019 मध्ये मुख्य प्रशिक्षक होते.

मुख्य प्रशिक्षकांच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचे टॉम मुडी, न्युझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन, लालचंद रजपूत, रॉबिन सिंग आणि वेस्ट इंडिज अफगाणिस्तानचे माजी प्रशिक्षक फिल सिमन्स हे देखील होते. मात्र रवी शास्त्री यांनी बाजी मारली. सिम्सन यांनी शुक्रवारी आपला अर्ज मागे घेतला होता.

शास्री यांचा रेकॉर्ड –

जुलै 2017 पासून शास्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने 21 पैकी 13 कसोटी सामन्यात विजय मिळवला. त्यांच्या विजयाची सरासरी 53.39 टक्के आहे. तर आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात विजयाची सरासरी 69.44 असून, भारताने 36 पैकी 25 सामने जिंकले आहेत. वनडेमध्ये भारताने 60 पैकी 43 सामने जिंकले आहेत. या वर्षी झालेल्या विश्वचषकात भारताने उपात्यं फेरीपर्यंत मजल मारली होती.

Leave a Comment