या कारणामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन जम्मू काश्मीरसाठी असणार खास

येत्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक कोपऱ्यात तिरंगा फडकवण्साठी भाजपाच्या प्रदेश कार्यकर्त्यांनी दिल्लीवरून 50 हजार खास झेंडे मागवले आहेत. हे झेंडे ठिकठिकाणांच्या कार्यकर्त्यांना आणि पंचायतींना वाटले जातील. नवीन केंद्र शासित प्रदेशात येत्या 15 ऑगस्टला 4 हजार पेक्षा अधिक पंचायतींमध्ये झेंडे फडकावले जातील. याच बरोबर सर्व गावांमध्ये कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येईल.

स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात तिरंगा फडवण्याच्या योजनेमुळे केंद्र सरकारने देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षेची तयारी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी सांगितले की, सिल्कचे 25 हजार आणि खादीचे 25 हजार झेंडे दिल्लीमध्ये खास ऑर्डरकरून मागवण्यात आले आहेत. हे झेंडे जम्मू-श्रीनगर आणि लेहमध्ये वाटले जातील. सर्व सरपंचाना कार्यक्रमाची रूपरेखा सांगण्यात आलेली आहे.

रैना म्हणाले की, जश्न-ए-आजादी साठी  सर्वांमध्ये जबरदस्त जोश आहे. असे वाटत आहे की, पहिल्यांदा गुलामीमधून बाहेर आलो आहोत.

तसेच, या दिवशी मोटारसायकल रँलीचे देखील आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाने यावर अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. सध्या पोलिस बकरी ईदवर लक्ष केंद्रित करून आहे. त्यांचे म्हणणे आहे की, बकरी ईद शांततेत पार पडली तर रँलीला परवानगी देण्यात येईल.

अजित डोवल यांनी प्रदेशाचे डीजीपी दिलबाग सिंह आणि मुख्य सचिव बी. वी. आर. सुब्रम्हण्यम यांच्याबरोबर चर्चा केली असून, परिस्थितीवर विशेष लक्ष्य ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Comment