लाखो वर्षापूर्वीच्या अजस्त्र पोपटाचे अवशेष मिळाले


पोपट हा जगात सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. न्यूझीलंड मध्ये मोठ्या आकाराचे पोपट आढळतात मात्र याच देशात लाखो वर्षापूर्वीचे अजस्त्र आकाराच्या पोपटाचे अवशेष मिळाले आहेत. हे अवशेष पाहून जगातील नामवंत तज्ञ आश्चर्यात पडले आहेत. वास्तविक हे अवशेष १० वर्षापूर्वीच मिळाले होते मात्र ते घारीचे असावेत असा अंदाज व्यक्त केला जात होता. संशोधनात ते पोपटाचे असल्याचे सिध्द झाले आहे.

हा पोपट ७ किलो वजनाचा आणि तीन फुट उंचीचा असावा असे संशोधकांचे निरीक्षण आहे. न्यूझीलंडच्या खानिको शहरात सेंट बथाय येथे संशोधकांना हे अवशेष १० वर्षापूर्वी मिळाले होते. त्यावर सिडनीच्या फ्लाईडर्स विद्यापीठ आणि ख्राईस्टचर्चच्या कॅटरबरी म्युझियम मध्ये या पोपटाची माहिती गोळा केली गेली. संशोधकांनी या पोपटाचे नामकरण हेरकल्स इनएक्स्पपेक्टारस असे केले असून त्याचा अर्थ हर्क्युलस सारखा विशाल असा आहे. हे जीवाश्म १९० लाख वर्षे जुने असावेत असा अंदाज असून हा पोपट छोटे पोपट खाऊन त्याचे पोट भरत असावा असाही अंदाज आहे.

आज आढळणारे बहुतेक पोपट शाकाहारी असतात आणि फळे, भाज्या, विविध प्रकारचा चारा खातात मात्र हा पोपट मांसाहारी असावा असा तर्क केला जात आहे. हा पोपट उडू शकत होता का या बाबत मात्र नक्की सांगता येणार नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment