झोमॅटो प्रकरणानंतर सोशल मीडियावर जोक्सचे वादळ


डिलीव्हरी बॉय मुस्लिम असल्याने ऑर्डर रद्द केल्यानंतर झोमॅटोन दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली. मात्र हे प्रकरण एवढ्याच थांबले नसून, आता या प्रकरणावर सोशल मीडियावर जोक्स आणि मिम्सचा वादळच आलं आहे.

ऑनलाईन फुड डिलीव्हरी अॅप असलेल्या झोमॅटोच्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर अनेक जोक्स आणि मिम्स शेअर केले जात आहेत.

https://twitter.com/kumark2805/status/1156814819036581888

एका युजर्सने ट्विट करत विचारले की, हलाल आणि झटकामध्ये काय फरक आहे ?  याच प्रश्नावर अनेकांनी भन्नाट उत्तरे दिली.  अनेकांनी आपल्या दैनदिन आयुष्यातील संदर्भ देत एकापेक्षा एक अशी हटके उत्तरे दिली.

मुस्लिम डिलीव्हरी बॉय असल्याने अमित शुक्ल या व्यक्तीने झोमॅटो अॅपवरील ऑर्डर रद्द केली होती. त्यानंतर झॉमेटोने देखील ‘अन्नाला कोणताही धर्म नसतो. अन्न हाच एक धर्म आहे’ असे उत्तर दिले होते. झॉमेटोचे संस्थापक यांनी देखील, ‘आमच्या तत्वांच्या आड येणाऱ्या ग्राहकांना गमावले तरी आम्हाला वाईट वाटणार नाही’, असे उत्तर दिले होते.

तसेच, झोमॅटोने देखील हलाल हा टॅग का लावतात ? यावर ट्विट करत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

याशिवाय अमित शुक्लने देखील या प्रकरणावर,  ‘श्रावणाचा पवित्र महिना सुरू असून, माझ्या वैयक्तिक निवडीचा हा मुद्दा असल्याचे म्हटले आहे.’

Leave a Comment