व्हायरल; लहान मुलांना मारतानाचा तो व्हिडीओ भारतातील नाहीच


मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी 20 जुलै रोजी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती लहान मुलांना बेदमपणे मारताना दिसत आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मला सांगण्यात आले आहे की, हे शिक्षक शकील अहमद अंसारी आहेत. कोणी याचे सत्य तपासेल का जर कंफर्म असेल तर रिट्विट करा. जेणेकरून व्हायरल होईल. पडताळणी केल्यावर समोर आले की, हा व्हिडीओ भारताचा नसून इजिप्तचा आहे.


राज्यपालांबरोबरच अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला. एका युजरने लिहिले की, ज्या शिक्षकांना आपण गुरू मानतो, तेच आज मुलांना अशाप्रकारे मारत आहेत. मी अशा घटनांचा विरोध करतो.

सत्य काय आहे ?
हा व्हिडीओ मागील वर्षापासूनच व्हायरल होत आहे. या व्हिडीओ वेगवेगळे कॅप्शन देऊन व्हायरल केले जात आहे. मागील वर्षी या व्हिडीओला गुजरातच्या एका शाळेशी जोडले होते. सत्य तपासल्यावर समोर आले की, हा व्हिडीओ भारतातला नसून इजिप्तचा आहे.

व्हिडीओमध्ये लहान मुलांना मारणार तो व्यक्ती इजिप्तच्या एका आश्रमातील प्रबंधक ओसामा मोहम्मद ओथमन आहे. या व्यक्तीच्या पत्नीनेच हा व्हिडीओ शूट केला होता. या घटनेला इजिप्तचे वृत्तपत्र Al-Ahram प्रकाशित करण्यात आले होते. डेली मेलद्वारे देखील हे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

Leave a Comment