जपानमध्ये तैनात झाली मोबाईल मशीद


जपानच्या टोक्यो मध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक २०२० स्पर्धांची तयारी जोरात सुरु असून टोक्यो मध्ये या तयारीचा एक भाग म्हणून मोबाईल मशीद तैनात केली गेली आहे. दोन मोठ्या ट्रकच्या सहाय्याने ही चालती फिरती मशीद कुठेही नेता येते. ऑलिम्पिकसाठी बाहेर देशातून येणाऱ्या मुस्लीम खेळाडू तसेच प्रेक्षकांची सोय करण्यासाठी अशी मशीद तैनात केली जात आहे. यात नमाज पडण्याची सर्व व्यवस्था केली गेली आहे. एकावेळी ५० लोक येथे नमाज अदा करू शकतील. टोक्यो स्पोर्ट्स अँड कल्चरल इव्हेंट कंपनीने ही चालती फिरती मशीद बनविली आहे.

जपानमध्ये पहिली मशीद कोबे येथे १९३५ साली बांधली गेली होती आणि सध्या जपान मध्ये ६० मशिदी आहेत. त्यात आता मोबाईल मशिदींची भर पडली आहे. इंडोनेशियात हा प्रयोग २०१६ पासून सुरु झाला असून तो यशस्वी ठरला आहे. गर्दीच्या मार्गावर लोक नमाज अदा करण्यासाठी वेळेवर पोहोचू शकत नाहती त्यांच्या सोयीसाठी अश्या फिरत्या मशिदी उपयुक्त ठरत आहेत. रशियाची राजधानी मास्को येथे २० लाख मुस्लीम आहेत तेथे ४ मशिदी आहेत. येथेही कार ला मिनीप्रेयर ट्रोली जोडून कुठेही नेण्याची व्यवस्था आहे.

Leave a Comment