‘व्हॉट्सअ‍ॅपवर सर्वात प्रथम मेसेज पाठवणाऱ्याची मिळू शकते माहिती’


व्हॉट्सअ‍ॅप मेसेज ट्रॅक करण्यावरून सरकार आणि कंपनीमध्ये मागील वर्षीपासून चर्चा सुरू आहे. पहिला मेसेज कोणी पाठवला, यासंबंधी माहिती सरकारने अनेकवेळा मागितली आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपने प्राव्हेसीचे कारण सांगत, मेसेज एंक्रिप्टेड असल्याने ट्रॅक केला जाऊ शकत नसल्याचे म्हटले होते. आता मद्रास उच्च न्यायालयात आयआयटी मद्रासचे प्रोफेसर वी कामकोटी यांनी म्हटले आहे की, तांत्रिक दृष्ट्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचे मुळ अर्थात सर्वात प्रथम मेसेज कोणी पाठवला अथवा कोठून आला याची माहिती मिळू शकते.

प्रोफेसरने न्यायाधीश एस मणिकुमार आणि सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाला सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे हे शक्य आहे की, मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर मेसेजबरोबरच पाठवणाऱ्याचा मोबाईल नंबर देखील जाईल. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला डिजाईन बदलावे लागेल.

जेव्हा कोणताही युजर्स कोणाच्याही सहमतीशिवाय त्याला मेसेज करू शकतो, तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या प्राव्हेसीचा दावा करू शकत नाही. हे प्रकरण एंटनी क्लेमेंट रूबिन द्वारा दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेशी संबंधीत आहे. त्यांनी सायबर क्राइमच्या प्रकरणात आरोपींची ओळख पटण्यासाठी आरोपींच्या सोशल मीडिया अकाउंटशी आधार लिंक करण्याची मागणी केली आहे.

मॉब लिचिंगच्या वाढत्या घटनांमुळे सरकार व्हॉट्सअ‍ॅप मेसेज ट्रॅक करण्यासंबंधी कंपनीशी चर्चा करत आहे. सरकार वारंवार व्हॉट्सअ‍ॅपला सांगत आहे की, असे एखादे फिचर आणावे, ज्यामुळे सर्वात प्रथम मेसेज पाठवणाऱ्याविषयी माहिती मिळू शकेल.

Leave a Comment