गूगल रस्त्यावर फिरुन कलेक्ट करत आहे लोकांकडून फेस डेटा


गूगल आपल्या नेक्स्ट जनरेशन फेशिअल रिकग्नायझेशन टेक्नोलॉजीला आणखीन चांगले बनवण्यासाठी एक नवीन पद्धत अवलंबत आहे. गूगलचे कर्मचारी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरुन यूझर्सकडून त्यांचा फेस डेटा कलेक्ट करत आहेत. गूगल त्यांना या बदल्यात 340 रुपयांचे गिफ्ट कार्डही देत आहे. डेटा घेण्यापूर्वी यूजर्सकडून परवानगी घेतली जाते आणि एका फॉर्मवर साइनदेखील करुन घेतली जाते. याप्रकारे कंपनी न्यूयॉर्कशिवाय अनेक शहरात डेटा कलेक्ट करत आहे. रिपोर्टनुसार हे पिक्सल 4 च्या फेस अनलॉकिंग फीचरला कंपनी आणखीन चांगेल करण्यासाठी करत आहे.

जेडडीनेटच्या रिपोर्टनुसार फेस डेटासाठी लोकांकडे गूगलच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक टीम विचारणा करत असल्याचे पाहण्यात आले आहे. कंपनीने हा प्रकार आपल्या नवीन गूगल पिक्सल 4 च्या फेस अनलॉक फीचरला आणखीन चांगले करण्यासाठी काढला आहे.

रस्त्यावर फिरुन हे कर्मचारी सगळ्यात आधी लोकांकडून त्यांची परवानगी घेतात, नेक्स्ट जनरेशन फेशिअल अनलॉकिंग फीचरला आणखीन चांगले बनवण्यासाठी हे सगळे करत असल्याचे त्यांना सांगितले जाते. त्यांना त्यानंतर एका मोठ्या बॉक्समागे उभे केले जाते आणि त्यांचा त्या बॉस्कमागे असलेला फोन त्यांचा फोटो घेतो. रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, हा फोन पिक्सल 4 स्मार्टफोन आहे.

Leave a Comment