
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने २ ऑगस्टपासून अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय दिला आहे. याप्रकरणी ५ न्यायाधीशांचे खंडपीठ सुनावणी करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर आणि बाबरी वादावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ३१ जुलैपर्यंत मध्यस्थ समिती काम करेल असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालय २ ऑगस्टपासून दररोज करणार राममंदिर प्रकरणी सुनावणी
३१ जुलैपर्यंत अयोध्या आणि बाबरी वाद प्रकरणात मध्यस्थांच्या समितीने अहवाल द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. २ ऑगस्टपासून हा अहवाल दिल्यानंतर दररोज सुनावणीला सुरुवात होईल असेही न्यायालयाने म्हटले आहे. याआधी मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून ३१ जुलै करण्यात आली आहे. मध्यस्थांच्या समितीकडून काय तोडगा निघतो ते देखील पाहू असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
