फेसबूक लवकरच लाँच करणार टिकटॉस सारखा भन्नाट अ‍ॅप


शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकने प्रभावित होत फेसबूक देखील अशाच प्रकारचा एक अ‍ॅप आणणार आहे. फेसबूकने मागील आठवड्यातच एनपीए (न्यू एक्सपेरिमेंटल अ‍ॅप डिविजन) टीम तयार केली आहे. फेसबूकच्या या टीममध्ये  शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप वाइन (VINE) चे जनरल मॅनेजर जेसन टॉफ असणार आहेत. फेसबूकच्या या नवीन अ‍ॅपबद्दलची माहिती देखील त्यांनीच ट्विट करत दिली. टिकटॉक 2019 मध्ये सर्वाधिक डॉऊनलोड करण्यात आलेला दुसऱ्या क्रमाकांचा अ‍ॅप आहे. तर अ‍ॅपल प्ले स्टोरवर सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेला हा अ‍ॅप आहे. त्यामुळे टिकटॉकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

कोण आहे जेसन टॉफ ?
जेसन टॉफने नुकतेच गुगलला सोडत फेसबूक ज्वाईन केले आहे. शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप वाइन येथे काम करत असताना जेसन टॉफला लोकप्रियता मिळाली. वाइनला 2012 मध्ये ट्विटरने खरेदी केले होते. जेसन 2016 पासून गुगलच्या एरिया 120 मध्ये काम करत आहे. या एरिया 120 मध्ये नवनवीन प्रोडक्टससाठी वर्कशॉप घेतले जातात आणि नवनवीन प्रयोग केले जातात.

जेसन टॉफवर असणार फेसबूकच्या नवीन अ‍ॅपची जबाबदारी –
मागील वर्षी फेसबूकने अनेक अ‍ॅप्स बंद केले व अनेक नवीन अ‍ॅप्स लाँच केले.  आता फेसबूकचे लक्ष व्हिडीओवर आहे. कारण फेसबूकच्या व्हिडीओ फीचरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. टॉफने ट्विट केले की, मला वाटते की, मी जे काही करत आहे त्यासाठी ही योग्य वेळ आहे. मी पुढील दोन आठवड्यात फेसबूकच्या एनपीए टीमबरोबर नवीन सुरूवात करत आहे.

Leave a Comment