
लखनऊ – उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यात झालेल्या धुवांदार पावसामुळे १५ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर राज्यात मागील ३ दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. यासंदर्भात अधिकृत माहितीनुसार, ९ जुलै ते १२ जुलैदरम्यान १५ लोक, २३ प्राणी मरण पावले. तर या ४ दिवसांत तब्बल १३३ इमारतील कोसळल्या आहेत.
धुवांदार पावसामुळे उत्तरप्रदेशातील तब्बल १३३ इमारती कोसळल्या
जोरदार पावसाचा तडाखा उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हर्दोई, खिरी, गोरखपूर, कानपूरनगर, पिलिभीत, सोनभद्र, चंडोली, फिरोजाबाद, माऊ आणि सुल्तानपूर या जिल्ह्यांना बसला आहे. पुढील ५ दिवसांत लखनौमध्ये काहीसे ढगाळ हवामान राहण्याचे आणि एक ते २ वेळा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. आजही उत्तराखंड, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, झारखंड, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, कर्नाटक किनारपट्टी, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्येही पावसाची शक्यता आहे.
