पत्नीपीडित पतींचे औरगांबादेत अनोखे आंदोलन


औरंगाबाद – वटपोर्णिमेचा सण महाराष्ट्रात रविवारी साजरा केला जाणार आहे. पत्नी या सणाला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करते. पण, औरंगाबाद येथील पत्नीपीडित पतींनी अनोखे आंदोलन केले आहे. या पुरुष मंडळींनी येथील वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुढच्या जन्मी, अशी पत्नी नको, अशी मनोकामना यमराजाकडे केली आहे.

औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षांपासून पुरुषांच्या हक्कासाठी पत्नी पीडित पुरुष संघटना आंदोलन करत आहेत. नवरा – बायको समान असल्याचा दावा केला जातो. मात्र, त्यांच्यात भांडण झाले की चूक कोणाची का असेना शिक्षा मात्र पुरुषांना मिळते. महिलांच्या चुकीची शिक्षा कधीकधी पुरुषांना भोगावी लागते. कायदेदेखील त्यात फक्त महिलांच्या बाजूने असल्याने पुरुषांचे म्हणणे कोणी ऐकत नाही, असा आरोप पत्नी पीडित संघटनेकडून केला गेला आहे.

वटपौर्णिमा रविवारी आहे. महिला यादिवशी वडाची पूजा करून आपल्या नवऱ्याच्या चांगल्या स्वास्थाची मनोकामना करतात. हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा, अशी मनोकामना करतात. पण, नवऱ्याला या जन्मी छळणाऱ्या बायकांचे ऐकू नको त्या खोट बोलत आहेत. या जन्मी नाही, तर पुढच्या जन्मीतरी, अशी बायको देऊ नको, अशी मनोकामना करण्यासाठी पत्नीपीडित पुरुष संघटनेने औरंगाबादच्या वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या आणि यमराजाकडे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारने पुरुषांच्या हक्कासाठी कायद्यात बदल करावा, अशी मागणी केली.

Leave a Comment