
मुंबई – शिवसेनेचे सर्व खासदार लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. सर्वजण तेथे जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच कोल्हापूर दौर्यावर जात आहेत. ते यावेळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर ठाकरे यांनी नुकतेच एकवीरा देवीचे दर्शन घेतले.
शिवसेना पक्षप्रमुखांसह रामलल्लाचे दर्शन घेणार नवनिर्वाचित खासदार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकवीरा देवीचे दर्शन आणि श्री अंबाबाईचे दर्शनानंतर 15 जूनला अयोध्येत शिवसेना खासदारांसह राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. राम मंदिर प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते पुन्हा एकदा शंख फुंकणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा शिवसेना उचलून धरणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.
