देशाच्या आराध्य दैवताबाबत ‘पागल’ रोहतगी बरळली


अभिनेत्री पायल रोहतगी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने काहीच दिवसांपूर्वीच राजाराम मोहन राय यांच्याबद्दल गरळ ओकल्यानंतर आता तिची मजल देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यापर्यंत गेली आहे.


राजा शिवछत्रपती हे मुळात क्षत्रिय कुळातील नसून त्यांचा जन्म शुद्र जातीतील एका शेतकऱ्याच्या घरात झाला होता, असे ट्विट तिने केले आहे. पायल रोहतगीने तिच्या ट्विटसोबत शिवाजी महाराजांचा फोटो देखील पोस्ट केला आहे. तिने हे वक्तव्य ट्विटर सोबतच इंस्टाग्रामवर देखील पोस्ट केले आहे.


तिने आपल्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म एक शुद्र वर्णाच्या कुणबी परिवारात झाला असून त्यांना पवित्र करण्याच्या कार्यक्रम आणि त्यांच्या पत्नीचे पुनरुत्थान केल्यानंतर ते क्षत्रिय झाले. त्यामुळेच त्यांचा राज्याभिषेक झाला. एका वर्णातील व्यक्तीने दुसऱ्या वर्णातील व्यक्तीचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्याला त्या वर्णामध्ये स्थान दिले जाऊ शकते, त्यामुळे सनातन जातीवाद नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण का दिले अशी देखील मुक्ताफळे तिने उधळली आहेत.

Leave a Comment