वर्ल्ड कप टीम – ऑस्ट्रेलिया

विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आणि २०१५ च्या विश्वचषकाचा विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ २०१९ च्या विश्वचषकात विद्यमान विजेता म्हणुन प्रवेश करणार आहे. एक वर्षापुर्वी चेंडू कुरतल्याप्रकरणी कर्णधार स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉप्टवर बंदी घालण्यात आली होती. स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर हे दोघेही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीतील महत्त्वाचे खेळाडु पण या दोघांवर एक वर्षाची बंदी घातल्याने ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमजोर झाली होती आणि मागील एक वर्षातील ऑस्ट्रेलियाची कामगिरी पाहता त्यांना स्मिथ व वॉर्नरची कमतरता जाणवली. स्मिथच्या अनुपस्थित फिंचने कर्णधारपद सांभाळले. आता एका वर्षाच्या बंदीनंतर स्मिथ व वॉर्नरने विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवले त्यामुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी भक्कम झाली आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये डेविड वॉर्नरने शानदार कामगिरी केली पण तब्बल एक वर्षांनंतर स्मिथ व वॉर्नर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे ते ही विश्वचषकात त्यामुळे ते कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

महत्त्वाचे खेळाडु:- स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल

आयसीसी क्रमवारीतील स्थान:- ५

विश्वचषकातील सर्वोच्च कामगिरी:- १९८७, १९९९, २००३, २००७ व २०१५ मध्ये विजेतेपद

यशस्वी कर्णधार अॅलन बॉर्डर (१९८७), स्टिव्ह वॉ (१९९९), रिकी पॉंटिग (२००३, २००७) आणि मायकेल क्लार्क (२०१५)
संघाच्या सर्वाधिक धावा ४१७/६ वि. अफगाणिस्तान (२०१५)
निच्चांकी धावसंख्या १२९ वि. भारत (१९८३)
सर्वाधिक धावा रिकी पॉंटिंग – १७४३ (१९९६ – २०११)
सर्वोच्च धावा डेविड वॉर्नर – १७८ वि. अफगाणिस्तान (२०१५)
सर्वाधिक शतक रिकी पॉंटिंग – ५
सर्वाधिक सरासरी मायकेल क्लार्क – ६३.४२
सर्वाधिक मोठी भागिदारी डेविड वॉर्नर व स्टिव्ह स्मिथ – २६० वि. अफगाणिस्तान (२०१५)
सर्वाधिक बळी ग्लेन मॅकग्रा – ७१ बळी
सर्वाधिक झेल रिकी पॉंटिंग – २८ झेल
सर्वाधिक झेल व यष्टिचीत अॅडम गिलख्रिस्ट – ५२ बळी (झेल ४५ यष्टिचीत ७)
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण ग्लेन मॅकग्रा – ७/१५ वि. नामिबीया (२००३)
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा मॅथ्यु हेडन (२००७) – ६५९ धावा
एका विश्वचषकात सर्वाधिक बळी ग्लेन मॅकग्रा (२००७) – २६ बळी
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल रिकी पॉंटिंग (२००३) – ११ झेल
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल व यष्टिचीत अॅडम गिलख्रिस्ट (२००३) – २१ बळी (झेल २१ यष्टिचीत ०)

संघ:- अॅरॉन फिंच (कर्णधार), स्टिव्हन स्मिथ, डेविड वॉर्नर, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, उस्मान ख्वाजा, जेसन बेहरेनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, नॅथन कुल्टर नाईल, पॅट कमिन्स, नॅथन लायन, शॉन मार्श, केन रिचर्डसन, अॅडम झंपा
१ जुन २०१९ वि. अफगानिस्तान सं. ६.००
६ जुन २०१९ वि. वेस्ट इंडिज दु. ३.००
९ जुन २०१९ वि. भारत दु. ३.००
१२ जुन २०१९ वि. पाकिस्तान दु. ३.००
१५ जुन २०१९ वि. श्रीलंका दु. ३.००
२० जुन २०१९ वि. बांग्लादेश दु. ३.००
२५ जुन २०१९ वि. इंग्लंड दु. ३.००
२९ जुन २०१९ वि. न्युझिलंड दु. ३.००
६ जुलै २०१९ वि. दक्षिण आफ्रिका दु. ३.००

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक
www.thedailykatta.com

Leave a Comment