
अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या ‘बस इतना सा ख्वाब है’, ‘युवा’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘बंटी और बबली’, ‘लागा चुनरीमें डाग’ या चित्रपटातील जोडीला चांगली पसंती मिळाली होती. तसेच बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी बऱ्यापैकी कमाई देखील केली होती. ही जोडी आता पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार असल्याचे समोर आले आहे.
‘बंटी और बबली’च्या सिक्वलमध्ये झळकणार अभिषेक-राणी
२००५ साली रिलीज झालेल्या ‘बंटी और बबली’चा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाचा सेट जूनच्या पहिल्या आठड्यात उभारण्यात येणार आहे आणि पुढच्या महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे.
२००७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लागा चुनरी में डाग’ या चित्रपटात अभिषेक आणि राणी मुखर्जी एकत्र दिसले होते. त्यानंतर ही जोदी रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळाली नाही. राणी मुखर्जी सध्या ‘मर्दानी २’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
