
नागपूर – वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रकाश आंबेडकर हे मदत करतात. तसेच भाजपला जिंकविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना ही निवडणुकीत करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्याचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप
मी अनेक वर्षांपासून पक्षात काम करत असून यंदाची निवडणूक ही अटीतटीची होती. पण आवश्यक ती मेहनत पक्षाने घेतली नाही. कारण भाजपला पक्षाअंतर्गत मदत केली गेली. राज्यात ताकद नसताना देखील राज्यातील ४७ जागावर उमेदवारांना रिंगणात उतरवून त्यांनी आरएसएसला सरळ पाठिंबा दिला. प्रकाश आंबेडकरांनी भाजपच्या विजयासाठी वंचितांची मते खाण्याचे काम केले. वंचित बहुजन आघाडीच्या ४७ जागांपैकी एकही जागा लोकसभेच्या निवडणूकीत निवडणून येणार नसल्याचे भाकितही पखाले यांनी वर्तवले आहे.
